अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची भर पडली.
नगर शहरातील वाघ गल्ली नालेगाव येथील ३८ वर्षीय महिला आणि अकोले तालुक्यातील काझी गल्ली, कोतुळ येथील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
हे दोन्ही रुग्ण यापूर्वी तेथे बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. दरम्यान, ३६ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
आज जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. यामध्ये संगमनेर, राहाता, शेवगाव आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.
आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४९ झाली आहे तर एकूण रुग्ण संख्या ३०४ इतकी झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews