अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त, वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात लोणी (ता. राहाता) आणि मुकुंदनगर (नगर शहर) येथील दोन कोरोना बाधित्तांचा १४ दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज बूथ हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज दुपारी त्यांना बूथ हॉस्पिटल मधून हॉस्पिटल देखरेखीखाली लोणी आणि नगर शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.या दोन्ही रुग्णांची तब्बेत चांगली असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ३१ कोरोना बाधितपैकी २० जण बरे झाले आहेत. तर, कोपरगाव येथील एक व जामखेड येथील एक अशा दोन जणांचा मृत्यु झाला आहे. सध्या येथील बूथ हॉस्पिटलमध्ये ९ जणांवर उपचार सुरू आहेत.

त्यामध्ये नेवासा येथील दोन, जामखेड येथील दोन, आलमगीर (ता.नगर) येथील तीन, आष्टी (जि.बीड) येथील एक व आयव्हरी कोस्ट येथील एक परदेशी नागरिक यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात बारा मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर मार्चचा शेवटचा आणि एप्रिलचा पहिला आठवडा रुग्ण वाढीचा ठरला. आरोग्य विभागतर्फे नागरी आणि ग्रामीण अशी विभागणी करण्यात आलेली आहे.

नगर तालुक्याच्या विचार करता महानगरपालिका हद्द व तालुक्यातील आलमगीर येथे मिळून आतापर्यंत ११ रुग्ण आढळले असून यापैकी ८ जण बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे. तर, तीन जणांवर उपचार सुरू आहेत. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24