अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : जामखेड मधील येथील खर्डा रस्त्यालगत असलेल्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकानात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली.
ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळले नसले तरी या आगीत या दुकानाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत जामखेड पोलिसात प्रवीण उगले यांनी तक्रार दिली आहे.
जामखेड-खर्डा रस्त्यालगत साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेलो होतो. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ठाणे अंमलदार व्ही. बी. चव्हाण यांचा फोन आला.
तुमच्या दुकानाला आग लागली आहे. ताबडतोब दुकानाकडे गेलो. खेमानंद येथील रोहित्र (डिपी) बंद केले. अग्निशमन दलाला बोलावले व त्यांनी आग विझवली.
परंतु तोपर्यंत दुकानातील मशिनरी, आॅईल, वायर व दुरुस्तीसाठी आलेले ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews