अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ४१ नवे रुग्ण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 (7.32 PM) :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३८४ इतकी झाली आहे तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ६६६ इतकी झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार, कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या १९ रुग्णांमध्ये नगर शहरातील १२, नगर ग्रामीण ०३, श्रीगोंदा ०२, राहुरी तालुक्यातील ०१ आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

नगर महापालिका क्षेत्रात मुकुंदनगर, गवळी वाडा, दिल्ली गेट, आंबेडकर चौक, मंगल गेट, सम्राट नगर, समतानगर, पाइप लाइन रोड, सिद्धार्थ नगर, स्वास्थ्य हॉस्पिटल, आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळून आले.

याशिवाय नागापूर येथे ०१, हिंगणगाव ०१ आणि रुई छत्तिशी येथे ०१ रुग्ण आढळून आला. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एक रुग्ण आढळून आला.

भिंगार येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आला. श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा आणि मांडवगन येथील प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळून आला.

  • उपचार सुरू असलेले रुग्ण: ३८४
  • बरे झालेले रुग्ण: ६६६
  • मृत्यू: २६
  • एकूण रुग्ण संख्या: १०७६

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24