अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथील शेख वस्तीवरील पाच शेतकऱ्यांच्या ५२ कोंबड्या मृत झाल्या आहेत. या कोंबड्यांच्या मृत्युचे नेमके कारण समजले नाही. मृत कोंबड्याचे नमुणे भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
तेथील अहवाल आल्यानंतरच कोंबड्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल अशी माहीती तालुका पशुधनविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे यांनी दिली.
तालुक्यातील मिडसांगवी येथील मुस्लीम वस्तीवरील पाच शेतक-यांच्या सुमारे बावन्न कोंबंड्या मृत पावल्या. शफीक चंदुभाई शेख यांनी कोंबड्या मृत झाल्याचे माहीती तालुका प्रशुधन विकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे यांना दिली.
पालवे यांनी मिडसांगवी येथे सोमवारी भेट दिली. कोंबड्यांचे शवविच्छेदन केले. काही नमुणे भोपाळ येथे पाठविले आहेत. दोन ते तिन दिवसात भोपाळ येथील अहवाल मिळाल्यानंतर कारण समजेल असे पालवे यांनी सांगितले.
रोगाबबात कोणी काही अफवा पसरवु नयेत असे आवाहनही पालवे यांनी केले आहे. सध्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यु रोग आल्याची चर्चा असल्याने हा विषय संवेदनशील बनला आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संबधीत अधिका-यांना सुचना दिल्या आहेत. काळजी घ्या व अफवा पसरु नयेत याबाबत लोकामधे जागृती करावी असे भोसले यांनी सांगितले आहे.