अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त आज या आजारातून बरे होऊन घरी परतले.
त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, संगमनेर ०३, राहाता ०२, नगर शहर ०१, कोपरगाव ०१ आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २०६ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे फक्त 41 रुग्ण राहिले असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आता हळूहळू कमी होत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews