अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरातील मुकुंदनगर भागात एका इमारतीमध्ये आणखी नऊ परदेशी व दोन भारतीय नागरिक आढळून आले आहेत.
याप्रकरणी या नऊ जणांना ठेवून घेत प्रशासनाला माहिती न दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान आता या सर्वांना सिव्हिल हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
यात इंडोनेशियामधील पाच, गुनाई देशातील चार नागरिक आहेत. राजस्थान व मध्य प्रदेशातील दोन नागरिक आहेत.
तिघांना विनापरवाना ठेवल्याप्रकरणी प्रशासनाला कोणती माहिती न दिल्याप्रकरणी
फिरोजवाले खान पठाण , शेख सोनू चाँद , अब्दुल सलाम खोकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुकुंदनगरमधील एका धार्मिकस्थळी व एका इमारतीमध्ये या सर्वांना एकत्रित ठेवण्यात आले होते.
या सर्वांना प्रार्थनास्थळी व खासगी जागेत एकत्र करून करोना या रोगाचा फैलाव होईल, हे माहीत असताना,
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com