अहमदनगर ब्रेकिंग : माजी मंत्री अनिल राठोड यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : शिवसेनेचे माजीमंत्री अनिल राठोड यांच्यासह आठ जणाविरुद्ध जिल्हाधिका-यांच्या जमावबंदी आदेशाचे उलंघन करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, कोरोना रोगाच्या प्रसाराबाबद खबरदारी न घेणे, कोरोना उपाययोजना २०२० चे अधिनियम ११, भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायद्या प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी अकरा वाजता श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे नियमांचे पालन न करता पुजा-यांना किराणा साहीत्याचे वाटप केल्याची घटना घडली. सोशल मिडीयावरुन छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर पोलिस कर्मचारी भगवान सानप यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड, दिलीप सातपुते,गिरीश जाधव, मदन आढाव, मनिष गुगळे, सतीष चोपडा, विशाल वालकर, मंदार मुळे सर्व राहणार अहमदनगर यांनी सोमवारी साकळी अकरा ते तिन या वेळेत श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे देवस्थानचे पुजारी व इतर सफाई कर्मचारी

यांना किराणा साहीत्याचे वाटप करताना अहमदनगर जिल्हाधिका-यांच्या जमावबंदी आदेशाचे पालन न करता, कोरोना रोगाच्या प्रसारासाठीची खबरदारी न घेता, मास्क न वापरता, सोशल डिस्टन्स न पाळता कार्यक्रम केला.

तसेच मुके प्राणी वानर, कुत्रे यांना खाऊचे वाटप केले. वरील कार्यक्रमाचे फोटो फेसबुक व वाँट्सअपवर व्हायरल केले. त्यामुळे वरील आठ जणाविरुद्ध भगवान सानप यांनी फिर्याद नोंदविली आहे. माजी आमदार व मंत्री असलेल्या राठोड  व त्यांच्या सात सहका-याविरुद्ध गु्न्हा नोंदविला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24