अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या राशीन येथील ५३ वर्षीय व्यक्तीवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या राशीन ते पुणे व पुणे ते राशीन हा प्रवास त्या व्यक्तीने केला.
तसेच ही व्यक्ती राशीन येथील कोरोना ग्रामसुरक्षा समितीला कोणतीही माहिती न देता कुटुंबासमवेत राहिला.
त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या ५३ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कामुळे कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews