ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : राहत्या घरात गॅसचा स्फोट, कुठे घडली ही घटना वाचा सविस्तर…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- तालुक्यातील वेस येथे एका राहत्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली आहे.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसून, गॅसच्या स्फोट मध्ये घराचे पत्रे उडून गेली व घरातील सामानही जळाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील वेस-सोयगाव येथे गुलाब कुंडलीक कोल्हे हे आपल्या परिवारासोबत राहतात.

आपल्या राहत्या घरात कोल्हे यांच्या पत्नी चंद्रकला या बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान स्वयंपाक करत असताना गॅस ला अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीला पाहून चंद्रकला या घाबरल्या व त्यांना काय करावे हे सुचले नाही.

कुंडलिक हे आपल्या घरातच होते त्यामुळे दोघेही मदतीसाठी घराबाहेर पडले असता गॅसचा मोठा स्फोट झाला व घराचे पत्रे उडून गेले. तसेच घरातील सामनाला आग लागून सामान जळून खाक झाले आहे.

दोघेही मदतीसाठी बाहेर गेल्याने हा मोठा अनर्थ टळला असून, या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. तसेच परिसरात आजूबाजूला घरे होती, मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.

या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की परिसरातील लोकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन घरातील आग विझविली. गॅसने कशामुळे पेट घेतला याचे नेमके कारण समजू शकले नाही.

माहीती मिळताच कोपरगाव गॅस कंपनीचे व्यवस्थापक लक्ष्मण निमसे तातडीने घटनास्थळी पोहचले त्यांनी गॅसची पुनर्जोडणी करून देणार असल्याचे सांगीतले.

निमसे म्हणाले,गॅस ग्राहकांनी आपण ज्या एजन्सीकडून गॅस घेतला आहे त्यांच्या वितरकांकडुनच गॅस टाक्या घेत जाव्यात.म्हणजे काही अडचण निर्माण झाल्यास मदतीस सोपे होते.

Ahmednagarlive24 Office