अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डीत साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेल्याने खळबळजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील मढी जवळील काकडदरा परिसरात ही घटना घडली.
ही चिमुकली राञी दरवाजाजवळ खेळत होती. त्याचवेळी हा बिबट्या काकडदारातील नागरी वस्तीत घुसला. ही चिमुकली तिथेच खेळत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घातली.
बिबट्या तिला उचलू घेऊन जंगलात निघून गेला. या प्रकाराने वस्तीवर गोंधळ उडाला. परंतु वस्तीवर अंधार असल्यामुळे आणि त्यातच पाऊस सुरू झाल्याने चिमुकलीच्या शोधात अडथळे आले.
या प्रकाराची वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक काकडदरा येथे सकाळी दाखल झाले असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved