अहमदनगर ब्रेकिंग : हायवेवर महिलेला दारु पाजून केला बलात्कार आणि अवघ्या चोवीस तासांत …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- संगमनेर बायपास नाशिक पुणे हायवेवर एक प्रवासी महिला चाकण येथे जाण्यासाठी वाहनांकडे मदत मागत होती. यावेळी तिला एका पिकअप चालकाने मदत दिली. 

मात्र या नराधमाने संबंधित महिलेस मारहाण करून तिला दारू पाजली व वाहनातच बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. 

ही घटना शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीसांना माहित झाली असता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्हयाचा तपास करत असताना अवघ्या बारा तासात पोलीसांनी या गुन्हयाचा छडा लावला असून आरोपी सुखदेव बबन कंकराळे (वय 39 रा. बारगाव पिंपरी ता.सिन्नर जि.नाशिक) यास बेडया ठोकल्या आहेत. 

आरोपीने गुन्हयात वापरलेली पिकअप देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून नारायणगाव येथे त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून गुन्हयाबाबत माहिती विचारली असता प्रथमता टाळाटाळ केली. 

मात्र पोलिसांनी पोलीसीखाक्या दाखविला असता तो  बोलता झाला. हा गुन्हा मीच केला असल्याची त्याने कबुली दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24