अहमदनगर ब्रेकिंग : व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्हातील आरोपीस अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कलिंगड व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्हातील मागील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपीस पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने मंगळवारी जेरबंद केले.

२०१८ मध्ये मुंबई येथील कलिंगड व्यापारी हसन उमर शेख यांचा विकत घेतलेल्या कलिंगडाची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव ता. जामखेड)

अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, नंदू तुकाराम पारे (सर्व रा. पारेवाडी ता.जामखेड) यांनी संगनमत करून २० मे ते २६ मे २०१८ दरम्यान वरील कलिंगड व्यापाऱ्याचा दोरीने गळा आवळून जीवे ठार केले.

मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून खेड (ता. कर्जत) शिवारातील भीमा नदी पात्रात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह टाकून दिला होता. या घटनेपासून या गुन्ह्यातील आरोपी नंदू तुकाराम पारे हा फरार होता.

मंगळवारी पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वरील फरार आरोपी हा कारेगाव (ता. शिरूर) येथून नगरकडे टेम्पोने जाणार आहे.

यावेळी पोलिस उपअधीक्षक सातव, सहायक निरीक्षक नीलेश कांबळे, कॉन्स्टेबल हृदय घोडके, संतोष साबळे, आदित्य बेल्हेकर, सागर जंगम यांच्यासह मोबाईल सेलचे कॉन्स्टेबल प्रशांत राठोड, नितीन शिंदे, महिला पोलीस रिंकी मांढेकर यांच्या पथकाने

खाजगी वाहनाने जाऊन नगर-पुणे महामार्गावर गव्हाणवाडी चेकपोष्टवर सापळा लावून हा टेम्पो थांबवला. आरोपी पारे यास त्याची चाहूल लागल्याने त्याने टेम्पोतून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न करताच वरील पथकाने त्यास जेरबंद केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24