Ahmednagar Breaking : तुरुंगात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपीने तुरुंगाच्या भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास येथील उप कारागृहामध्ये घडली.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शोहेब शब्बीर शेख हा संगमनेर येथील उप कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे. त्याने शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास लॉकअप मधील बरॅक नंबर एक मधील भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेत त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला त्वरित घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत पोलीस नाईक आशिष कुंडलिक आरवडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शोहेब शब्बीर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.