अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून मृतदेह जाळल्यानंतर आरोपी पोलिसात हजर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकुरखे गावात घडली आहे.चारीत्र्याच्या संशयावरून पतीने त्याच्या पत्नीचा निर्घृणपणे हत्या करत तिचा मृतदेह जाळला.

याबाबत सविस्तर माहीती अशी की सुनील जनार्दन लेंडे हा एकुरखा शिवारात राहायचा त्याचे 2008 साली छाया हिच्यासोबत लग्न झाले होते त्यांना तीन मुले आहेत. सुनील हा छायाच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यातून त्यांच्यात नेहमी वाद होत असत.

अनेक वेळा तिच्या नातेवाईकांनी दोघांचे वाद मिटविले. शनिवार दि 22 फेब्रुवारी रोजी पती सुनील याने त्याचे आई वडील यांना रूई येथे नातेवाईक वारले असून तुम्ही मुलांना घेऊन जा असे सांगून त्यांना पाठवून दिले.

शनिवारी सायंकाळी ४ वाजता पत्नी छाया हिला घेऊन सुनील शेतात घास कापण्याच्या बहाण्याने घेऊन गेला होता. शेतात घास कापत असताना बेसावध असलेल्या छायाच्या डोक्यात पाठीमागून सुनीलने लाकडी दांड्याचा प्रहार करत तिचा खून केला आणि मृतदेह शेतातच टाकून देत घर गाठले.

यावेळी त्याने सोबत पेट्रोल आणि रिकामी गोणी नेली होती. उशिराने पत्नीचा मृतदेह पोत्यात टाकून घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतर दूर जात रस्त्याच्या कडेला पोत्यातील मृतदेह पेट्रोलच्या साहाय्याने पेटवून दिला.

तेथून निघून तो रात्री 10 वाजेच्या सुमारास थेट राहाता पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मयत छायाचा जळालेला मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेत लोणी येथे दवाखान्यात पाठविला.

दरम्यान या घटनेची फिर्याद मयत छायाचा भाऊ सतिश तरस याने राहाता पोलीसांत दिली त्यावरून राहाता पोलीसांनी पती सुनिल याच्या विरूध्द भादवी कलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24