अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- सावेडी उपनगरातील गजराज फॅक्टरीच्यासमोर अमोल थोरात याचा दगड व धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
आज सायंकाळी ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, थोरात व त्याचे मित्र हे आज सायंकाळी दारू पिण्यासाठी बसले होते.
दारूची झिंग पडल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. त्याचे पर्यावसन भांडणात झाले.
त्यातूनच मित्रानेच आपल्या मित्राचा खून केला. तोफखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews