अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- गेल्या पाच वर्षात खोटे मूल्यांकन करून व किंमत वाढवून अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी कर्जाची उचल केली.
आवश्यकता नसतानाही मोठ्या प्रमाणावर खर्च केला असे आरोप अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळावे केले जात होते.
अखेर सततच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या अगस्ती कारखान्याच्या सर्व संचालकांनी आपले संचालक पदाचे राजीनामे आज कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेकडे सुपूर्द केले.
दरम्यान सर्वानी राजीनामे दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान यावर बोलताना पिचड म्हणाले, ‘अगस्ती सहकारी साखर कारखाना मी हयात असेपर्यंत मोडू देणार नाही,
ज्यांच्यात धमक असेल ‘त्या’ वीरांनी समोर यावे आणि जनताच आमच्या बाजूने कौल देईल’ असा ठाम विश्वास व्यक्त करत, ‘आपण ही या पदावर राहण्यास उत्सुक नाही’ असा टोला विरोधकांना लगावला.