अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षांच्या अविवाहित तरुणीवर बलात्कार करणाऱ्या १८ वर्षीय तरुणास अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात बलात्काराच्या घटना थांबत नाहीयेत कोल्हार परिसरात राहणाऱया एका २५ वर्षांच्या अविवाहित तरुणीवर तिच्या रहात्या घरी तसेच प्रवरा नदीकाठी काटवन झाडीत नेवून वेळोवेळी बलात्कार केला.

फेब्रुवारी २०२० पासुन अनेक वेळा आरोपी अक्षय दिनकर पवार, वय १९ रा. अंबिकानगर, कोल्हार, ता.राहाता याने पिडीत तरुणीवर लग्नाचे अमिष दाखवुन वेळोवेळी बलात्कार केला.

या शरीरसंबंधातून तरुणी गर्भवती राहीली तेव्हा तिने अक्षय पवार याला लग्न करून घे असे सांगितले, तेव्हा आरोपी अक्षयने तुझ्या पोटातील गर्भ काढून टाक मला तुझ्याशी लग्न करता

येणार नाही असे म्हणत लग्नास नकार दिला पीडित तरुणीने काल वरीलप्रमाणे फिर्याद दिल्यावरून आरोपी अक्षय दिनकर पवार याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात

आला व तातडीने तपास करुन आरोपी अक्षय दिनकर पवार याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने कोल्हार परिसरात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24