अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीपात्रात ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह शनिवारी आढळला. मृतदेह सडलेला असल्याने ओळख पटली नाही.

सरपंच दादासाहेब भुसारी यांनी पोलिसांना कळवताच बोधेगाव दूरक्षेत्राचे पोलिस नाईक संतोष धोत्रे, कॉन्स्टेबल अभय लबडे यांनी पंचनामा करून मृतदेह शेवगाव रुग्णालयात पाठवला.

मृताबाबत माहिती असल्यास शेवगाव पोलिस ठाणे (०२४२९/२२१२३३) किंवा तपासी अधिकारी संतोष धोत्रे यांच्याशी संपर्क साधावा.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24