अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राज्यात गाजलेल्या अहमदनगर जिल्हा रुग्णालय मधील अतिदक्षता कोविड कक्षामध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे.
आताच हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत सुरवातीला ११ जणांचा मृत्यू झाला होता आता ही संख्या वाढली असून खाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या रंभाबाई अंजराम विधाते यांचा मृत्यू झाला आहे.
या कोविड कक्षा मध्ये एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते त्यापैकी 14 रुग्ण दगावले असून दोन रुग्ण सध्या उपचार घेत आहेत तर एका रुग्णास उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयु वार्डला भीषण आग लागली होती. या दुर्दैवी घटनेत 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर जखमींना नगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र त्यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. पुढे यातील मृत्यूंची संख्या देखील वाढत गेली. आज खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे