अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा एक बिबट्या जेरबंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी परिसरात रविवारी सायंकाळी आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

पाथर्डी तालुक्यातील तीन बालकांचा बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागातून आलेल्या वनविभागाच्या पथकाने गर्भगिरी डोंगरावरील जंगलात मोठी शोधमोहीम हाती घेतली.

तीन दिवसांपूर्वी मायंबा परिसरातील पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. या बिबट्याला जुन्नर येथील वन विभागाच्या केंद्रात नेण्यात आले असून तो नरभक्षक आहे का, याची तपासणी केली जात आहे.

त्याबाबतचा अहवाल येईपर्यंतच रविवारी सायंकाळी आणखी एक बिबट्या शिरसाटवाडी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला, अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून समजली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24