अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे आणखी एक रुग्णाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  बुधवारी संगमनेर तालुक्यातील श्रमिकनगर येथील पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शहरातील ऑरेंज कॉर्नर येथील ५९ वर्षीय पुरुष व ७३ वर्षीय महिला, गणेश नगर येथील ६५ वर्षीय पुरुष आणि निमगावजाळी येथील २८ वर्षांची महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

संगमनेरमधील बाधितांचा आकडा १६९ झाला आहे. यातील १५३ व्यक्ती मूळ रहिवासी आहेत, तर १६ बाहेरील जिल्ह्यातील आहेत. १०० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

५३ रुग्ण अ‍ॅक्टिव असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन उपाययोजनांवर भर देत असून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणवर तपासण्या करण्यात येत असल्याने बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

मंगळवारी रात्री उशिरा कुरणमधील ११, तर पेमरेवाडीतील १ अशा १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पठार १, पेमगिरी १, पिंपळगाव कोंझिरा ३, खंडगाव २, ढोलेवाडी १, गुंजाळवाडी २, रहेमतनगर १ अशा ११ रुग्णांचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला.

बुधवारी शहरातील श्रमिकनगर येथील ५७ वर्षीय पुरुषाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. आणखी चौघांचा अहवालही पॉझिटिव्ह आला. मृत्यूचा आकडा १३ वर, तर बाधितांचा आकडा १६९ झाला आहे.

मंगळवारी दुपारपर्यंत तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, रात्री उशिरा कुरण येथील ५ पुरुष व १९ वर्षीय युवकासह ४० वर्षीय महिला व चार मुली, तसेच पेमरेवाडीच्या ५० वर्षीय महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24