अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
बाधीत रुग्णा पैकी एक व्यक्ती जामखेड येथील असून दुसरी व्यक्ती नेवासे येथील आहे. जामखेड येथील व्यक्तीचा ३ दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता.
आज त्याचा अहवाल आला आणि तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आज स्पष्ट झाले.
जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल काल पॉझिटिव्ह आले.
उर्वरित ३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.बाधीत रुग्णा पैकी एक व्यक्ती जामखेड येथील असून दुसरी व्यक्ती नेवासे येथील आहे.
जामखेड येथील व्यक्तीचा ३ दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. आज त्याचा अहवाल आला आणि तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
तसेच नेवासे येथील एका व्यक्तीचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आज स्पष्ट झाले.
दरम्यान आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून नेवासा – 1, कोपरगाव – 1 , आणि जामखेड – 1 तालुक्यातील हे रुग्ण आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®