अहमदनगर: स्टेशन रस्त्यावरील हॉटेल कॅफे फरहत शेजारी असलेली युनियन बँकच्या शाखेतील अर्लामच्या वायरी व कॅमेरे फोडून बँक फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला.
मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. स्टेशन रस्त्यावरील हॉटेल कॅफे फरहत शेजारी युनियन बँकची शाखा आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या अर्लामच्या वायरी तोडल्या.
तसेच दोन कॅमेरे फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला. कॅमेरे फोडताना चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. बँकेचे शटर तोडण्यापूर्वीच सायरन वाजू लागल्याने चोरटे पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास वाघ आदींसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ब्रांच मॅनेजर विजयकुमार वाडबुदे यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ हे करीत आहे. बँकेत फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®