अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- राज्यात अनेक भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडत असतानाच श्रीगोंदा तालुक्यातील निमगावखलू चेकनाक्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला.
या कर्मच्याऱ्याने प्रसंगावधान दाखवल्याने त्याचा जीव वाचला.या घटनेबाबत पो.ना मुकेशकुमार बडे यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्र.सी.जी ०८ ए एम ७६६१वरील अज्ञात चालकाविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमगाव खलू येथे श्रीगोंदा पोलिसांनी चेकपोस्ट उभारला आहे, दौंडकडून येणाऱ्या वाहनांची येथे कसून तपासणी केली जाते, या चेकनाक्यावर पो.ना बडे हे दि.८रोजी रात्री आपले कर्तव्य बजावत होते.
त्यावेळी दौंडकडून नगरच्या दिशेने ६० ते ७० माणसे घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला बडे यांनी इशारा करून ट्रक थांबवण्यास सांगितला. त्यावेळी ट्रक चालकाने ट्रक न थांबवता बडे यांना मुझे मत रोको नही तो में आपको ठोक दुगा असे म्हणत बडे यांच्या अंगावर ट्रक घातला.
बडे यांनी प्रसंगावधान दाखवत स्वत:चा जीव वाचवला.या गडबडीत संबंधित ट्रकचालक तिथून पळून नगरच्या दिशेने गेला, परंतु लोणीव्यंकनाथ येथे पोलिसांनी पाठलाग करून ट्रक पकडला,
चालक ट्रक सोडून पळून गेला पोलिसांनी ट्रक व त्यातील प्रवास करणाऱ्या ६०ते ७०जणांना ताब्यात घेतले. नंतर या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना पुढील प्रवासास रवाना केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®