अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर भक्तनिवासात नेऊन अत्याचार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- लग्नाचे अमिष दाखवत येथील एका वीस वर्षीय तरूणीवर एका देवस्थानच्या भक्तनिवासात नेऊन अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला जीवे ठार मारून टाकील अशी धमकी दिली.

याबाबत पीडित तरूणीच्या फिर्यादीरून पाथर्डी पोलिसांत येथील अशोक मोहिते याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी येथील एका वीस वर्षींच्या तरूणीस अशोक मोहिते याने लग्नाचे आमिष दाखवत एका देवस्थानच्या भक्त निवासामध्ये सदरच्या तरूणीवर अत्याचार केला.

तसेच याबाबत तू जर कोणाला काही सांगितले तर तुला जीवे ठार मारून टाकील, अशी धमकी दिली. याप्रकरणी शहरातील एक वीसवर्षीय मुलीशी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात (२०१९) घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी अशोक अण्णा मोहीते याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला असून, आरोपी मोहीतेला अटक केली आहे.

इंदिरानगर भागात राहणाऱ्या एका वीसवर्षीय युवतीला अशोक मोहीते याने लग्नाचे आमिष दाखविले. डिसेंबर २०१९ मध्य (वेळ व तारीख आठवत नाही) येथील भक्त निवासमध्ये घेवुन गेला तेथे युवतीवर अत्याचार केला. त्यानंतर तुझे कोणाशी लग्न होवु देणार नाही.

घडलेली घटना कोणाला सांगितली तर तुला व तुझ्या कुंटुबातील इतर व्यक्तीला जिवे ठार मारील अशी धमकी दिली. पीडित युवतीने दि.१७ डिसेंबर २०२० रोजी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अशोक मोहीते याला पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24