अहमदनगर ब्रेकिंग : ‘क्वारंटाईन‘ च्या वादावरुन खुनाचा प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- क्वारंटाईन करण्यासाठी नावे देत असल्याच्या संशयावरुन सात जणांच्या टोळक्याने तिघांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात डोक्यात तलवारीने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे मंगळवारी (दि.26) रोजी ही घटना घडली. यामध्ये तीघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शनिवार (दि.29) रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंगपळगाव लांडगा येथील जिल्हा परिषद शाळेसमोर धनंजय लांडगे हे उभे होते. त्यावेळी अस्लम शेख व इरत तेथे आले.

तू क्वारंटाईन करण्यासाठी दुसर्‍याची नावे का सांगतो. तुझा भाऊ दिल्लीवरुन आला आहे. त्याला का नाही क्वारंटाईन करीत. असे शेख हा म्हणून लागला, त्यावर धनंजय हा समजावून सांगत होता.

त्यामुळे रागवलेल्या टोळक्याने धनंजय त्याचे वडिल व चुलतभावाच्या डोक्यात तलवारीने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक जारवाल हे करत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24