अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील पाचेगाव फाटा येथे लाखो रुपयांची BMW ह्या प्रसिद्ध कंपनीची कार आगीत जळून खाक झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे.
पवन प्रकाश सदाशिवे रा.औरंगाबाद (रा.अरिहंत जवाहर कॉलनी) हे परिवारासह शिर्डी येथून औरंगाबाद येथे परतत असताना पाचेगाव फाट्यानाजीक कारने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात कार जळून आगीत खाक झाली.
पवन सदाशिवे हे गाडी चालवत होते. आग लागल्यानंतर गाडीतून बाहेर निघूपर्यंत त्यांच्या हाताला व पायाला, पोटाला भाजले असून पुढील उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.