अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून परत आलेल्या विठ्ठल रावजी शेलार (वय ५५, रा. गवतेवाडी, वांबोरी) यांचा राहत्या घरापासून काही अंतरावर मृतदेह आढळून आला.(Ahmednagar Breaking)
या घटनेबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. विठ्ठल शेलार हे जागरण गोंधळ कार्यक्रमास गेले होते.
मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर ते जखमी अवस्थेत आढळून आले.
नातेवाईकांनी त्यांना वांबोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ते मृत झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली.
रविवारी वांबोरी येथे शवविच्छेदनानंतर विठ्ठल शेलार यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शव विच्छेदन अहवालानंतर शेलार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा उलगडा होणार आहे. पुढील तपास वांबोरी पोलिस करीत आहेत.
घरापासून काही अंतरावर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या विठ्ठल गवतेंच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतर होणार आहे.