अहमदनगर ब्रेकिंग : स्मशानभूमीजवळ कारमध्ये आढळला मृतदेह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे गहणारे भाऊसहेब सोमनाथ कातोरे, (वय ४५) हे त्यांच्या मालकीची इंडिका कार नं. एमएच १४ इपी ९८०५ ही घेवुन घरातून गेले ते परत आले

नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता देवठाण रोडजवळील स्मशानभूमीजवळ इंडिका कारमध्येच सिटवर आडवे पडलेल्या स्थितीत भाऊसाहेब कातोरे आढळून आले.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी तपासले असता भाऊसाहेब कातोरे हे उपचारापूर्वीच मयत झालेले हाते. तशी खबर त्यांचा मुलगा निलेश भाऊसाहेब कातोरे याने अकोले पोलिसात दिल्यावरुन पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24