अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील लोणी बु. ते तळेगाव जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कडेला असलेल्या स्मशानभुमी जवळ इलेक्ट्रीक डीपीच्या खाली संतोष गोर्डे हा तरुण पडलेला हाता.
त्याच्या डाव्या बाजूच्या डोळयाजवळ काहीतरी लागल्याने रक्तस्त्राव होवून तो मृतस्थितीत मिळून आला. याप्रकरणी गणेश ताराचंद गोर्डे, रा. सोसायटीजवळ, लोणी खुर्द यांनी तशी खबर लोणी पोलिसात दिल्यावरुन अमुून.
८९ नोंदविण्यात आला असुन मयत संतोष ताराचंद गोर्डे, वय ३५ रा. लोणी खुर्द, ता. राहाता या तरुणाचा नेमका कसा मृत्यू. झाला? याचा पुढील तपास पोसई सूर्यवंशी हे करीत आहेत.
घटनास्थळी सपोनि समाधान पाटील यांनी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. संतोषच्या डोळ्याजवळ नेमके काय लागले? रक्तस्राव कसा झाला? काही घातपात आहे का? अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.