अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ शिवारात वनकुटे रस्त्यावर २२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अजय रावसाहेब मदने असे या मृताचे नाव असून तो बोकनकवाडी, वासुंदे येथील रहिवासी आहे. पोलिसांनी अजय याच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
पूर्ववैमनस्यातून अजयचा घात करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांनी टाकळी ढोकेश्वर येथील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
वडगाव सावताळ ते वनकुटे रस्त्यादरम्यान असलेल्या जंगलामध्ये एका ओढ्याजवळ अजयचा मृतदेह आढळून आला. वन विभागाच्या चौकीदाराने ही बाब वडगाव सावताळ येथील नागरिकांना दिल्यानंतर टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्राचे कर्मचारी तेथे दाखल झाले.
अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके व अजित पाटील, सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनीही घटनास्थळास भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews