अहमदनगर ब्रेकिंग : चिकन बिर्याणीची पार्टी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा :- तालुक्यातील मांडवगण गोसावीवाडी गोरे मळा येथील आंब्याच्या झाडाखाली ११ जणांनी विनापरवाना एकत्र येत चिकन बिर्याणी बनवण्याचा बेत आखला होता. मात्र पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे. 

लॉकडाऊन मध्ये चिकन बिर्याणीची मेजवानी 11 जणांना भोवली आहे. बिर्याणीवर ताव मारण्याअगोदर या तरुणांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी रघुनाथ साठे यांनी फिर्याद नोंदविली आहे. मांडवगण येथील गोसावीवाडी येथील काही तरुण एकत्र जमून चिकन बिर्याणीची मेजवानी करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली.

त्यानुसार काल(१०) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पोलीस पथकाने छापा टाकला त्यावेळी विशाल वाल्मीक कुसेकर, वैभव प्रकाश मनवरे ,गौरव नवनाथ मनवरे ,राहुल बापू पवार, रवींद्र वाल्मीक कुसेकर,भाऊसाहेब गोरख पवार,

अतुल श्रावण चौगुले, ऋतिक विठ्ठल जाधव, चेतन राजू मनवरे, सुरज अशोक मनवरे, भास्कर मारुती कुसेकर (सर्व रा. गोसावीवाडी, मांडवगण, ता. श्रीगोंदा) हे बिर्याणीची मेजवानी करताना आढळून आले.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरील अकरा जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24