अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे विहिरीत बुडून मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला. संकेत विलास पवार (वय १६) असे त्याचे नाव आहे.
राहुरी ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com