अहमदनगर ब्रेकिंग : अन्नातून विषबाधा झाल्याने बालकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. 

याबाबत समजलेली माहिती अशी की संभाजी बाबासाहेब ठोंबरे हे चिचोंडी पाटील येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत. बुधवारी रात्री घरातील जेवणामुळे संभाजी यांना व त्यांची पत्नी शुभांगी ठोंबरे तसेच मुलगा सम्राट ठोंबरे (वय- साडेतीन वर्ष) या तिघांना जेवणानंतर उलटी व मळमळ सुरू झाली. 

या विषबाधेमुळे सम्राट ठोंबरे यांचा मृत्यू झाला आहे. विषबाधा मुळे लहान मुलाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करत आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24