अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यात पिकअपने उडविल्यामुळे तिसरीच्या वर्गात शिकत असलेला चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मांडवगण वेशीकडून बगाडे कॉर्नरकडे दुचाकीवरून जाणारे योगेश सुभाष कदम आणि त्यांच्या दुचाकीवर असलेला आयुष जयेश कदम (वय ९वर्षे) यांना पाठीमागून आलेल्या पिकपने ( नंबर एम.एच.१६ क्यु ४६५) उघडविल्यामुळे आयुष जयेश कदम दुचाकीवरुन रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या अंगावरून पिकअप गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
ही घटना मांडवगण वेशीजवळ कचरे हॉस्पिटल समोर घडली. आयुष कदम हा श्रीगोंदा येथील प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत होता. डॉ.जयेश कदम आणि डॉ. वंदना कदम यांचा तो मुलगा होता.
श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल दहिफळे करीत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews