अहमदनगर ब्रेकिंग : पाच कोटींच्या सिगारेट पकडल्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पुणे जिल्ह्यातील यवत येथून आज काही आरोपीनी आयटीसी कंपनीच्या सिगरेटचा ५कोटींचा मुद्देमाल असणारे दोन ट्रक हायजॅक करून ते नगर पुणे हायवेने नगरच्या दिशेने पळून जात असताना श्रीगोंदा येथील सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी गव्हाणेवाडी चेक नाक्यावर मोठ्या शिताफीने पकडले.

यवत येथून दोन ट्रक हायजॅक करून ते नगरच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून आज गव्हाणेवाडी चेक नाक्यावर बंदोबस्तावर असणारे सहायक पो निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली.

त्यामुळे त्यांनी आपल्या सहकारी पोलिसांच्या मदतीने ट्रक रोखण्यासाठी याठिकाणी ट्रॅफिक जॅम करून ट्रक ला अडथळा केला त्यामुळे चेकनाक्यावर एक ट्रक पकडण्यात यश मिळाले परंतु दुसऱ्या ट्रकने मात्र बेरीकेटिंग तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

परंतु स पो नि सानप व त्यांच्या पथकाने काही अंतरावर पाठलाग करून हा ट्रक पकडला यावेळी पोलिसांनी हे ट्रक हायजॅक करणारे मध्यप्रदेश मधील पाच सराईत आरोपी ताब्यात घेतले हे आरोपी व दोन ट्रकसह पाच कोटींचा पकडलेला मुद्देमाल पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आला.

सदर कारवाई सहायक पो नि राजेंंद्र सानप,पोलीस कर्मचारी गाढवे नेमणूक महामार्ग ट्राफिक,कोळपे बेलवंडी पो ठाणे, दांगट , वाकडे , जाधव, पवार नेमणूक मुख्यालय ,होमगार्ड चोरमले, शिंदे यांनी केलेली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24