अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज २८ नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
दरम्यान आज संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधित महिलेसह एका कोरोना संशयित पुरुषाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथे एका व्यक्ती कोरोना संशयीत म्हणून मयत झाला असून संगमनेर शहरात नाईकवाडापुरा येथील एक ५० वर्षीय महिला मयत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात आता मयतांची संख्या 11 वर जाऊन पोहचली आहे.
शहरात नाईकवाडापुरा येथील ठिकाणी ज्या महिलेस त्रास होत होता तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिचा आज कोरोनाशी लढताना मृत्यु झालाय.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथे एका 85 वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर एका 45 वर्षीय संशयीत व्यक्तीस कोरोनाच्या तपासणीसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा रिपोर्ट अद्याप प्राप्त नाही. मात्र, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews