अहमदनगर ब्रेकिंग:’ह्या’ बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :  अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना कोरोनाने ग्रासल्याचे समोर आले आहे.

नगर रचना विभागातील कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

त्या पाठोपाठ आरोग्य आणि आस्थापना विभागातील एका अधिकाऱया कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक कोरोनाने शिकार झाले होते . त्यांच्या संपर्कात आलेल्या सात ते आठ कर्मचारी व या विभागात त्यामुळे खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24