अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.
या व्यक्तीने एका खाजगी रूग्णालयात तपासणी केली असता तो पॉझिटीव्ह मिळून आला आहे.
त्याच्या संपर्कात घारगावमधील एका डॉक्टरांसह अन्य तिघे आल्याची माहिती समोर आलीय.
यांची आरोग्य प्रशासन चौकशी करीत आहे. या एका रुग्णामुळे आता संगमनेर तालुक्याचा आकडा 85 वर जाऊन पोहचला आहे.
तर या व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे, जनतेले घाबरुन जाता स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews