अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेल्या रुग्णाचा आज मंगळवार दि.19 रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संगमनेर तालुक्यातील निमोण येथील कोरोना संशयितांचा आज दि.१९ रोजी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या त्या संशयितांचा कोरोना चाचणी अहवाल अद्याप मिळाला नसल्यामुळे हा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील निमोणे येथील व्यक्ती रविवार दि.१७ रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याकारणामुळे तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली.
यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्याला ताबडतोब अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
काल सोमवार दि.१८ रोजी जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या स्रावाचे नमुने घेण्यात आले; परंतु आज मंगळवार दि.१९ रोजी सकाळी कोरोना अहवाल येण्याआधीच त्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे कोरोना चाचणी अहवाल आल्याशिवाय संशयितांचा मृत्यू कोरोनामुळे झाला कि नाही हे स्पष्ट होईल. दरम्यान जिल्हा रुग्णालयात मयत झालेली हि व्यक्ती तालुक्यातील धांदरफळ येथील मयत व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक प्रशासन वारंवार आवाहन करूनही कोरोना संशयित तपासणीसाठी लवकर पुढे येत नसल्याचा समोर येत आहे. परिणामी संक्रमितांचे आणि उपचारा अभावी मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com