अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे.नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत.

रिपोर्ट आल्यानंतर त्याला या व्हायरसची लागण झालेली आहे की नाही हे तपासून योग्य तो निर्णय घेऊन उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी   दिली आहे.

नेवासा येथे राहणारा व अहमदनगर जिल्ह्यातील सूपा एमआयडीसी येथील एका नामांकित कंपनीत काम करणारा २५ वर्षीय तरुण हा कंपनीच्या कामानिमित्त काही दिवसांपूर्वी चीनमध्ये गेला होता.

चीनमधून घरी  परतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्याला श्रीरामपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, त्याच्यात कोरोना व्हायरसची लक्षण आढळून आल्याने त्याला तातडीने अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर तात्काळ उपाय सुरु करण्यात आले आहेत.

दरम्यान अहमदनगर जिल्हा रुग्णालयात स्पेशल कोरोना व्हायरस आयसोलेशन कक्ष उभारण्यात आला आहे. या विशेष कक्षात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना येथे दाखल करण्यात येत आहे.
अहमदनगर लाईव्ह 24