अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर कँन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात कोरोनाने धडक दिलीय. या कार्यालयातल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
काल संध्याकाळी या कर्मचार्यांच्या स्रावाचे पाॅझिटिव्ह अहवाल आले असून आज (दि. २०) यासंदर्भात सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये सदर अहवाल पाठविण्यात येणार आहे.
कँन्टोन्मेंट बोर्डाच्या ज्या कर्मचार्यांचा कोरोनाचा पाॅझिटिव्ह रिपोर्ट आलाय, त्यामध्ये चालक, क्लार्क, स्टोअर किपर आदींचा समावेश आहे. दरम्यान, भिंगारवासियांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com