अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : संगमनेरात सुरु असलेला कोरोनाचा कहर पुन्हा एकदा उफाळून आला असून आज सकाळी शहरातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धक्का सहन करणार्या संगमनेरकरांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
गेल्या रविवारी (ता.21) शहरातील राजवाडा परिसरात आढळलेल्या 38 वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची अप्रिय वार्ता हाती आली असून या वृत्ताने संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या महिलेच्या रुपाने कोरोनाने संगमनेर शहरातील पाच जणांसह तालुक्यातील एकुण दहा जणांचा बळी घेतला आहे. गेल्या रविवारी (ता.21) सकाळी संगमनेर शहराला जोरदार धक्का बसला होता.
रविवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्थानिक प्रशासनाला सोपविलेल्या अहवालानुसार बाधित क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजवाडा परिसरात पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला होता.
आज सकाळी एकापाठोपाठ चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या बातमीने खळबळ उडालेली असतांना आता रविवारी बाधित आढळलेल्या जोर्वेनाका परिसरातील राजवाडा येथे राहणार्या ‘त्या’ 38 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
त्या महिलेच्या मृत्युने कोरोनाची लागण होवून शहरातील बळींची संख्या पाच तर तालुक्यातील बळींची संख्या दहावर जावून पोहोचली आहे. आज संगमनेरात एकाचवेळी चार नवीन रुग्ण व एकाचा बळी गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मागील रविवारी (14 जून) संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील एक 72 वर्षीय महिला संक्रमित आढळली होती. प्रत्यक्षात तिच्यावर उपचार सुरु असतांनाच त्या महिलेला हृदयविकाराचा जोरदार धक्का बसल्याने त्यातच तिचा मृत्यु झाला होता.
त्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच कोरोनाच्या विषाणूंनी शहराला दुसरा धक्का देत राजवाडा येथील 38 वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews