अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमीयुगलाची रेल्वेखाली आत्महत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील एका प्रेमीयुगलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर येळपणे परिसरात खळबळ उडाली आहे.

मनमाड दौड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात यांनी रेल्वेखाली जीव दिला असून राजू बाबा कोळपे (वय ३८) व राणी राजेंद्र साबळे (वय ३०) असे या प्रेमीयुगलाचे नाव आहे.

सोमवारी रात्री ही घटना घडली असून याबाबत सविस्तर माहिती अशी कि राजू व राणी दोघे विवाहीत होते. पण गेल्या महीन्यापासून राजू व राणी यांचे प्रेमसंबंध आले.

सोमवारी सकाळी अकरा वाजता दोघेही घरातून बाहेर पडले घरच्यांनी बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली.

सोमवारी रात्री उशीरा दोघांनी महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली. दरम्यान या प्रेमीयुगलाने रेल्वेखाली आत्महत्या का केली हे स्पष्ट झाले नसून याबाबत पोलीस तपास सुरु आहे.

सदर घटनेबाबत बापू कोळपे यांच्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पो उप नि अमित माळी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत पुढील सूत्रे वेगाने फिरवली

अहमदनगर लाईव्ह 24