अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने जीवन संपविले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- भिंगार येथे शेतातील विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने आपले जीवन संपविले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बादल हरिचंद्र वाल्मिकी (वय २६), बबली बादल वाल्मिकी (वय १९) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाल्मिकी दाम्पत्य हे भिंगार परिसरातील इंदिरानगर परिसरातील रहिवासी आहे. रविवार (दि.२४) रात्री पासून हे दोघे गायब होते.

त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत भिंगार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. भिंगार येथे बुऱ्हानगर रोडवरील लष्करी हद्दीत असलेल्या एका शेतातील विहिरीत शुक्रवारी सकाळी कसला तरी वास येत असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता,

त्यांना विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. सुरक्षा रक्षकाने तातडीने याबाबतची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. भिंगार पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान दाम्पत्यांने आत्महत्या का केली? हे मात्र समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24