अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकल्याचा रागातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचारी संदीप चितळे यांनी ही फिर्याद दिली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा शहरातील हॉटेल्स सृष्टी जवळ छापा टाकून जुगाराचे साहित्य जप्त केले होते.
त्यात हॉटेल मालक मंगेश गांजुरे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांजुरे हे श्रीगोंदा तालुक्यातील एका राजकीय नेत्यांचे नातेवाईक आहेत.
या पूर्वीही हॉटेल मालक मंगेश गांजुरे याने पोलिसांविरोधात खोटानाटे अर्ज करून गुंतविण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी जुगारावर कारवाई केल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आले.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 507 प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com