अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी आपल्या किर्तनात वक्तव्य केले होते. की, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथिला झाला तर मुलगी होते,आणि अशुभ तिथिला झाला तर संतती रंगडी व बेगडी जन्माला येते.
हे वादग्रस्त विधान इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून वेळोवेळी केले होते.या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या समर्थकांनी अक्षेप घेतला होता.
या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यानि त्यांना नोटीस पाठवली होती.
यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांन मार्फत बाजू मंडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल अशी नोटीस दिली होती.
इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त विधानानंतर संगमनेर आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी कायद्याच्या समुचित प्राधिकार्यांनी यासंदर्भातील योग्य पुरावे जमा करून न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केले होती.
परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. अखेर लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर संगमनेर ग्रामीण हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षकांकडून तीन महिन्यांनंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर यांच्याकडून इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेर प्रथम न्यायदंडाधिकार्यांकडे 19 जूनला खटला दाखल करण्यात आला. इंदोरीकर महाराजांविरोधातील पहिली सुनावणी 26 जूनला होणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews