अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-कोरोना विषाणू (कोव्हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात आंतर रुग्ण होऊन दाखल होणाऱ्या रूग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांच्या नेमणूक करण्यात आल्या होत्या.
मात्र, आदेश मिळूनही कामावर गैरहजर राहिल्याने फिजीशिअन डॉ. पियुष मराठे यांच्यावर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत असताना कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी हा गुन्हा दखल करण्यात आला आहे.
कोरोना काळात सर्व यंत्रणांनी त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत.
जिल्हा रूग्णालय, अहमदनगर या ठिकाणी अंतररुग्ण होवून ऍडमिट होणाऱ्या रुग्णांची तपासणी करुन प्रोटोकॉलनुसार तातडीने उपचार व्हावा यासाठी डॉ.पियुष मराठे व इतर वैदयकिय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली होती.
तसेच नेमणूक करण्यात आलेल्या वैदयकिय अधिका-यांना नेमणूकीच्या कालावधी दरम्यान जिल्हा रुग्णालयाचे आवारातच उपस्थित राहून कार्यवाही करणेबाबत तसेच जिल्हाधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय जिल्हा रुग्णालयाचे आवार सोडू नये,
असे निर्देश देण्यात आलेले होते. मात्र, नेमणूक करण्यात आलेली असताना व निर्देश दिलेले असताना डॉ. मराठे हे नेमणूकीच्या ठिकाणी गैरहजर असल्याची बाब निदर्शनास आल्याने त्यांना करणे
दाखवा नोटीस देवून नोटीस मिळालेपासून दोन दिवसात खुलासा सादर करण्यास कळविण्यात आले होते. तथापि, नोटीस प्राप्त होऊन देखिल अदयापही डॉ. मराठे यांनी या कार्यालयास खुलासा सादर केलेला नाही.
त्यामुळे शासकीय कामकाजात हलगर्जीपणा करून वरिष्ठांच्या आदेशाची अवमानना केली. त्यामुळे भारतीय दंड संहिता (45 आफ 1860) च्या कलम 188 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेचे नायब तहसिलदार राजू गोविंद दिवाण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved