अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळल्या ‘त्या’अवस्थेतील मृतदेह, परिसरात खळबळ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोज कुंड पर्यटनक्षेत्र परिसरात कुकडी नदीपात्रामध्ये मोठया डब्यामध्ये मृतदेह आढळून आला असून तो महिलेचा असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पुणे जिल्हयातून वाहत येणा-या कुकडी नदीवर निघोज शिवारात कुंड परिसरात जगविख्यात रांजणखळगे आहेत. याच परिसरातील कोल्हापर पद्धतीच्या बंधा-यावरून वाहत येत.

पुणे जिल्हयातील टाकळीहाजीकडे जाणा-या जुन्या पुलास डब्यासह हा मृतदेह आडकला असल्याचे सांगण्यात येत आहे. डब्याबाहेर आलेल्या केसांवरून तो मृतदेह महिलेचा असावा अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे.

यासंदर्भात पारनेर पोलिसांना माहीती दिल्यानंतर स्वतः सहाययक पोलिस निरीक्षक राजेश गवळी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24